झाली माझ्या कवितांची होळी -

[मूळ रचना- आली माझ्या घरी ही दिवाळी...]

झाली माझ्या कवितांची होळी 
भर बंबात घालून झाली ..

छंद काव्याचा बंद न व्हावा, मी तर त्यात रमावे 
जन्म जन्म या काव्यासंगे, एकरूप मी व्हावे 
गोड पत्नी हसे, मीही त्याला फसे 
कागद घेऊन खुश्शाल जाळी .. 

पाऊल पडता घरी कितीदा, कागद जिकडे-तिकडे   
वाट लावते पत्नी त्यांची, अरसिक करी तुकडे 
हर्ष दाटे उरी, नाच पत्नी करी 
होई छंदाची राखरांगोळी ..
.

[सप्तरंग- सकाळ रविवार १८ ऑक्टोबर २००९]


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा