तीन चारोळ्या -

 "विश्वासघात -" 

अपुला म्हणुनी घालत बसलो 
गळ्यात त्याच्या गळा -
कळले नाही कापत गेला 
कधि केसाने तोच गळा . . .
.


"तुम लढो, हम कपडे -"

अफझलखान वध बघायला 
जो तो येथे टपला आहे -
मात्र शिवाजी होण्याला 
जो तो पूर्ण विसरला आहे . .
.


"स्व भाव -"

 नकोस मिरवू तोरा कधीही 
 भलेपणाचा ह्या जगती -
पदोपदी रे कलंक भाळी 
टपले लावण्या ह्या जगती !
.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा